मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.
शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
या शेतकरी विधेयकामुळे बाजार समित्यात रुमाल टाकून सौदे करणाऱ्या दलाल आडत्यांना शेतकऱ्यांना फसवतां येणार नाही म्हणून आज या दलालाची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे #FarmActsGameChanger
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 8, 2020
दरम्यान,आजच्या ‘भारत बंद’वर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे. या शेतकरी विधेयकामुळे बाजार समित्यात रुमाल टाकून सौदे करणाऱ्या दलाल आडत्यांना शेतकऱ्यांना फसवतां येणार नाही म्हणून आज या दलालाची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

