नवी दिल्ली : जगप्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटनंतर सोशल मीडिया विभागला गेला आहे. असे असले तरी रिहानाचा विरोध करण्यात बॉलीवूड सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतल्याचे नुकतेच दिसून आले. अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी तसेच दिग्दर्शक करण जोहर यांनी बाहेरच्या लोकांनी भारतातील प्रश्नांत नाक खुपसण्याची गरज नसल्याचे म्हटले.
बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही रिहानाच्या ट्विटवरून प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, इतर कोण-काय बोलतो यात अजिबात इंटरेस्ट नाही. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानेही नुकतेच एक निवेदन जारी केले असून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर इतर कोणाचाही दखल खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हटले. बाहेरच्या लोकांना त्यांचा प्रपोगेंडा अजिबात चालवू देणार नसल्याचे त्यात म्हटले आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील कडक पोलीस बंदोबस्तावरून मोदी सरकारवर टीकेची तोफही डागली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सरकारचे काम शेतकऱ्यांना धमकावणे आणि मारणे नाही. दिल्लीत एवढी बॅरिकेडिंग का करण्यात आली आहे? शेतकरी तुमचे शत्रू आहेत का? ते म्हणाले की, सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. कृषी कायदे मागे घेतले जावेत, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी देशाला तारून नेले आहे, शेतकरीच या देशाचा कणा आहेत. पण सरकारने मात्र त्यांना बरबाद करायचे ठरवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

