नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.
कालच्या घटनेत ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत १७ खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.
जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. या कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,या घटनेनंतर आता पुढे या आंदोलनाचे काय होणार ? सरकार चर्चा करणार कि नाही याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना दिल्लीत झालेल्या घटनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं आम्ही कधीही म्हटलेलं नाही. चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का? जेव्हा काही होईल, तेव्हा तुम्हाला सांगू, असं उत्तर जावडेकर यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- ‘दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट’
- अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढणार ? आता काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार !


