Share

‘मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही’, महसूलमंत्री थोरात यांचे स्पष्टीकरण

Published On: 

पुणे : अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये आजचा त्यांचा दौरा ठरलेला आहे.

ओल्या दुष्काळामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला व्यक्त केले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या या मागणीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणे हे महत्त्वाचे आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचे की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे पाहावे लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती थोरात यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!