नवी दिल्ली : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी टोल ब्लाझा येथे चक्का-जमा होत आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आले.
दरम्यान याच मुद्द्याला धरून कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. रक्तबंबाळ झालेल्या एका शेतकऱ्यांचा फोटो ट्वीट करत राहुल गांधी यांनी ‘शेतकऱ्यांचे रक्त पुन्हा सांडले, हिंदुस्थानची मान शरमेने झुकली’ असे म्हणत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1431571975256821763?s=20
तर करनाल येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या लाठीचार्जवर आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी शरसंधान साधले. 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगर येथे होणाऱ्या महापंचायतपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने रचलेले हे षडयंत्र असल्याचे राकेश टिकैत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन ; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी झाला रक्तबंबाळ
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

