नवी दिल्ली : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी टोल ब्लाझा येथे चक्का-जमा होत आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आले.
दरम्यान, तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बैठकीसाठी आलेल्या भाजप नेत्यांच्या गाड्या थांबवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर महामार्गावर ठिय्या ठोकून रास्ता रोको केला. करनाल येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या लाठीचार्जवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शरसंधान साधले. 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगर येथे होणाऱ्या महापंचायतपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने रचलेले हे षडयंत्र असल्याचे आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत म्हणाले आहेत.
हरियाणा के करनाल में बसताड़ा टोल पर आन्दोलित किसानों पर लाठी चार्ज दुर्भाग्यपूर्ण है 5 सितंबर मुजफ्फरनगर में होने वाली महापंचायत से ध्यान भटकाने के लिए सरकार षड्यंत्र रच रही है देशभर के किसान पूर्ण रूप से तैयार रहें । एसकेएस के फैसले का पालन करें।#FarmersProtest @sakshijoshii pic.twitter.com/FeqUmlPkcS
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) August 28, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त ; मग महिलांनी दाद मागायची कुठे ?
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप


