औरंगाबाद : गेल्या तीन-चार दिवसांपासून वरुणराजाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील उर्वरित पेरण्यांना गती आली आहे. शनिवार पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ७५ हजार हेक्टरपैकी ८५ टक्के क्षेत्रातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे गेले दोन ते तीन आठवडा दडी मारलेल्या पावसाच्या येण्याने शेतकरी वर्गामध्ये मात्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी जून महिन्यात पावसाची सुरुवात समाधानकारक राहीली. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यापासूनच पेरणीला ब्रेक लागला होता. मात्र ज्या शेतकर्यांनी पेरणी केली त्यांच्या पुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जून महिन्यात सोळा दिवस होऊनही पाऊस पडलाच नाही. त्यामुळे मका, कापूस, सोयाबीन, आणि तूर हे पीक करपण्याच्या स्थितीत आले होते. तब्बल पाच लाख हेक्टर शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या यात समावेश होता. मात्र पाच जुलैला काहीठिकाणी पावसाने हजेरी लावली. व त्यानंतर ८ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आता दूर झाले आहे.
शिवाय अनेक शेतकऱ्यांनी राहिलेल्या पेरण्या पूर्ण करण्यावर जोर दिला आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात दीड लाख इतरही पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी ६ लाख १० हजार हेक्टरातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक मका, कापूस पिकाचा समावेश आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनच्या क्षेत्रातही पाच हजार हेक्टर ची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या आहेत. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता इतर बँकांनी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालवले’
- ‘रिपब्लिकन ऐक्य आता कठीण’, रामदास आठवलेंनी बोलून दाखवली खंत
- स्मार्ट औरंगाबाद गप्पा… मात्र, महत्त्वाच्या जालना रस्त्यावरील मेलेला कुत्रा उचलायलाही वेळ नाही?
- आता गडकरीही म्हणाले, ‘इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप’; सुचवला ‘हा’ पर्याय
- गडकरींचा धडाका; तब्बल 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

