मालेगाव : शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत पुढील काळात कृषी विभागाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल विक्री करण्यासह त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होईल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री यांनी दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील खडकी येथे माळमाथा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले, खडकी येथे स्थापन करण्यात आलेल्या माळमाथा शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता माळमाथा परिसरातील इतरही तरुण शेतकऱ्यांना सहभागी केल्यास या कंपनीचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या मालावर प्रकिया करण्याबरोबरच रोपवाटीका, बिज उत्पादन सारखे विविध उपक्रम राबवून ही कंपनी नावारुपाला आणण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. चाळीसगाव फाट्यावरील आदित्य कृषी एजन्सीच्या किसान सुविधा केंद्रामार्फत माती नमुना परिक्षण, संतुलित खत वापराबाबत मार्गदर्शन, बीज परिक्षण सेवा, पीक लागवड विषयक सल्ला, कृषी विस्तार कार्यक्रम आदि विनामुल्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकेल ते पिकेल या संकल्पनेतून उदयास आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये तरूण शेतकऱ्यांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगत विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ म्हणाले, जिल्हयात एकूण 210 नोंदणीकृत कंपन्या असून नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेवून महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून याकडे पहावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यापुढे शेतकरी हा कर्जमाफीच्या कुबड्या शिवाय उभा राहण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकास व विस्तारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले. प्रगतशिल शेतकऱ्यांच्या नवनवीन संकल्पना स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- पवारांनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्याकडे वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे : राष्ट्रवादी
- मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ९ डिसेंबरला राष्ट्रपतींना भेटणार
- ‘शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही’ : सोनू सूद
- मतदार नोंदणीतील दुर्लक्ष भाजपला भोवले- देवेंद्र फडणवीस
- शेतकऱ्यांच्या एल्गाराचा आज दहावा दिवस, ८ तारखेचा भारत बंद होणारच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

