🕒 1 min read
मुंबई- बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत खा.शरद पवार यांनी हा दावा केला आहे.
कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे.त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
यावर महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. ‘आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. असा इशाराच ठाकूर यांनी थेट शरद पवार यांनाच दिला आहे.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी दिलेल्या व्यक्तव्याकडे एक वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे. त्यात काही राजकारण नाही. महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षाच्या विचाराचं भक्कम सरकार आहे. बराक ओबामांनी लिहीलेल्या पुस्तकात त्यांनी राजकारणातील नेत्यांवर काही व्यक्तव्य केलं आणि यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला त्यामुळे हा काही राग नाही एक वडिलकीच्या नात्याने संदेश आहे त्याकडे तसं बघावं.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- हमीभावानं खरेदी सुरूच राहील; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांची ग्वाही
- ‘रावण खलनायक नव्हता’असं म्हणणारा सैफ अली खान होतोय ट्रोल
- 1 जानेवारी पासून UPI पेमेंटवर शुल्क आकारणी
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

