🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन सुरु ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला आहे. तर आता बॉलिवूड स्टार सोनू सूद याने देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे.
किसान का दर्ज़ा माँ बाप से कम नहीं है।
— sonu sood (@SonuSood) December 5, 2020
यासंदर्भात सोनू सूदने ट्विट केलंय, ‘शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही’ असं ट्विट करत त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. याआधी सोनूनं ट्विटमध्ये केवळ 3 शब्द लिहीत शेतकऱ्यांना आपलं समर्थ असल्याचं दर्शवलंय. ‘किसान है हिंदुस्तान’ म्हणजेच शेतकरी हिंदुस्तान आहे, अशा आशयाचं ट्विट केलं होत.
दरम्यान, केंद्र सरकारने घाईघाईत लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास ‘मौन व्रत’ धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदर पुनावाला ‘एशियन ऑफ दी इयर ’
- केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला
- आम्ही तीन पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही- हसन मुश्रीफ
- ‘दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच’
- ‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’, सैफवर भडके भडकले राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

