Share

मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ९ डिसेंबरला राष्ट्रपतींना भेटणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास ‘मौन व्रत’ धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे.

पंजाब किसान युनियनचे नेते रुलधू सिंह यांनी सांगितलं की, किसान युनियनच्या नेत्यांनी मौन व्रत धारण केलंय. सरकार हे कायदे मागे घेणार की नाही या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही.पंजाब किसान युनियनचे कायदेशीर सल्लागार गुरलाभ सिंह महल यांनी सांगितलं की, सरकार हे कायदे मागे घेणार की नाही याच उत्तर ‘होय’ किंवा ‘नाही या शब्दात शेतकऱ्यांना उत्तर अपेक्षित आहे. शनिवारच्या पाचव्या फेरीच्या बैठकीत शेतकरी नेते आपल्या तोंडावर बोट ठेऊन होय की नाही असा फलक हातात घेऊन बसले होते.

सलग दहा दिवस आंदोलन सुरु असतानाही सरकारला त्याची पर्वा नाही, सरकारला कोणताही तोडगा काढायचा नाही असं मत शेतकऱ्यांच्या नेत्यांचं झाल्याचंही काहींनी सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता मौन व्रत धारण केल्याचं सांगितलं जातंय.

तर दुसरीकडे कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. आता हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे.

आता शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भेट घेणार आहेत. शरद पवार राष्ट्रपतींशी कृषी कायद्यांविषयी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!