जालना: भोकरदन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी म्हणजे दि. १७ जून रोजी पीक कर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बँकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज शुक्रवारी दि. १८ जून रोजी सकाळी संतप्त शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने मारहाण करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी बँकेसमोर ठिय्या आंदोलन केले.
भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील शेतकरी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पीक कर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी भोकरदन शहरातील एसबीआय बँकेच्या शाखेत गेला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे बँकेचा व्यवहार बंद असल्याने बँकेचे गेट बंद करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांने गेटमधून विचारणा केली असता. बँकेतील काही अधिकारी व कर्मचारी भडकले व त्यांनी संबंधित शेतकऱ्याला शिवीगाळ करून नंतर बँकेबाहेर येऊन बेदम मारहाण केली असल्याचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह अनेक पक्ष व सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करणाऱ्या बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर संतप्त शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी ठिय्या आंदोलन केले.
महत्वाच्या बातम्या
- वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही – पंकजा मुंडे
- शिक्षक पात्रता परीक्षेला आव्हान देणार्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या
- औरंगाबादेत जैविक कचऱ्याची संख्या कमी होईना, संसर्ग निम्म्यावर तरी कचरा तेवढाच!
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘या’ राज्यात आढळला चक्क नदीत कोरोना विषाणू !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
