Share

शिबानी दांडेकरसोबत फरहान अख्तरने केली दिवाळीची पूजा ; फोटो झाला व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच लोकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीची आराधना केली जाते. कलाकार देखील दिवाळीची पूजा करतात. यानिमित्त फरहान अख्तर आणि गर्लफ्रेंड शिबानी यांनी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नुकताच बॉलिवूडचा दिग्दर्शक, निर्माता आणि प्रभावी अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फरहान त्याची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरसोबत दिवाळीची पूजा करताना दिसत आहे. नुकतीच फरहानने त्याच्या ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा केली. या शेअर केलेल्या फोटोमध्ये दिग्दर्शक रितेश सिधवानी देखील दिसत असून, फरहान आणि शिबानी शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेफोटोमध्ये फरहानने पांढऱ्या रंगाची ट्राउझर आणि निळ्या रंगाचा कुर्ता घातला असून, शिबानीने गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये फरहान शिवानीला गंध लावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना फरहानने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून, सोबतच स्माईलीचे ईमोजी देखील पोस्ट केले आहे. शिबानीने त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले,’मिठाई, आठवणी आणि हास्याच्या सणासाठी, दिवाळीच्या शुभेच्छा.

https://www.instagram.com/p/CVza1MqM7kE/?utm_medium=copy_link

फरहान आणि शिबानी बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर आणि लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. फरहान आणि शिबानीने कधीही त्यांचे नाते जगासमोर मान्य केले नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम नेहमीच व्यक्त होत असते. फरहानने शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना, इंस्टग्राम अकाउंटवर त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘अगदी मनापासून, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू.’ मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावरील त्यांचा पुजा करतांनाचा  फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना लाईक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!