🕒 1 min read
मुंबई: महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे केवळ भारत नव्हे तर जगभरातील तीन महान क्रिकेटपटू आहेत आणि या तिघांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत. नुकतेच ट्विटरने या तिघांच्या नावापुढे बकरीचे चिन्ह म्हणजेच G.O.A.T (सर्वकालीन महान) इमोजी दिली आहे. जे पाहून नेटकरी आनंदित झाले आहेत.
जेव्हा जेव्हा नेटकरी “#Virat Kohli” किंवा “#RohitSharma” किंवा “#MSDhoni” असे ट्विट करेल तेव्हा क्रिकेटपटूंच्या नावांमागे बकरीचे चिन्ह (G.O.A.T) जोडले जाईल. विशेष म्हणजे इमोटिकॉनचा शोध लागल्यापासून, ट्विटरवरील चाहते शांत राहू शकले नाहीत आणि त्यांच्या संबंधित आवडत्या क्रिकेटपटू म्हणजेच धोनी, कोहली आणि रोहितवर भरभरून स्तुती करून ते हॅशटॅगचा भरपूर वापर करत आहेत.
https://twitter.com/Rajneesh_16/status/1496398687395880961?s=20&t=fjcF9LcmBcOSj6UFmAYL3A
Wow , Virat Kohli got a GOAT Symbol hashtag on Twitter????
GREATEST OF ALL TIME … #ViratKohli???? pic.twitter.com/SEWcjgZdaH
— Crix_in_Veins???? (@Cric_In_Veins) February 23, 2022
ROHIT SHARMA GOAT ????
#RohitSharma???? | @ImRo45 pic.twitter.com/2JHvXTm8qI
— ROHIT TV™ (@rohittv_45) February 23, 2022
बकरीचे चिन्ह त्या लोकांना दिले जाते जे त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत असतात. म्हणजेच GOAT हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या वाक्याचा शॉर्टफॉर्म आहे. ज्याचा अर्थ बकरी असा होतो आणि यामुळेच कोणालाही बकरीचे चिन्ह मिळाले म्हणजे तो महान आहे असे समजले जाते. क्रिकेट व्यतिरिक्त, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या इतर खेळातील स्टार्सनाही ट्विटरवर G.O.A.T आयकॉन देखील मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच होणार स्पष्ट? – वकील उज्ज्वल निकामांचे वक्तव्य
- श्रीलंका मालिकेसाठी गंभीरचा सल्ला ; ‘या’ खेळाडूने पुजाराची जागा घ्यायला हवी
- ‘नवाब मलिकांच्या अटकेनंतर बहीण सईदा खान यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार वठणीवर आणावं लागेल’ – चंद्रकांत पाटील
- “द्रविडने साहाला काहीही चुकीचे सांगितले नव्हते”; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
