मुंबई : काही दिवसातच भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा अष्टपैलु रवींद्र जडेजा हा कसोटीत पुनरागमन करत आहे. या दौऱ्यात भारताच्या विजयात जडेजा हा विजयात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाद्वारे महत्वाची भूमिका बजावू शकतो.
रविंद्र जडेजा गेल्या काही महिन्यात भन्नाट फॉर्मात आहे. त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी तर उत्कृष्ठ आहेत. मात्र क्षेत्ररक्षणात तो सर्वेत्कृष्ठ आहे. आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचे श्रेय हे जडेजाने चाहत्यांना दिले आहे. कारण जर एखाद्यावेळी मी जर झेल सोडला तर चाहते टिक करत नाही. उलट असे म्हणतात की चुकुन झाले असेल त्याच्याकडून असे म्हणत मला समजुन घेतात. जेव्हा फलंदाज खेळत असतो तेव्हा मला अंदाज नसतो की तो कोणता फटका खेळेल आणि किंवा कुठे खेळेल मात्र मी चेंडुच्या दिशेने वेगाने धावतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले.
जडेजाने अनेकदा चक्क सिमारेषेवरुन थ्रो करत फलंदाजाना धावबाद केले आहे. अनेकदा जडेजाकडे चेंडु गेला की फलंदाज धावा काढायला घाबरतात. तसेच अफलातुन झेल घेण्यासाठीही तो प्रसिद्ध आहे. आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना रवींद्र जडेजाने ८ झेल पकडले. तसेच आयपीएलच्या इतिहासात जडेजा सर्वाधिक धावबाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत २४ वेळा फलंदाजाला धावबाद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामदेवबाबा पुन्हा बरळले; यावेळी ‘खिलाडी’च्या खांद्यावरुन साधला ऑलोपॅथीवर निशाना
- “भावा खेळावर लक्ष दे” व्हिडीओ शेअर केल्यानंतर सैनी चाहत्याकडून ट्रोल
- वडिलांच्या निधनासाठी रुग्णालयाला जबाबदार धरत संभावना सेठने पाठवली कायदेशीर नोटीस
- ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखवर लॉकडाउनमुळे बेरोजगार होण्याची आली वेळ
- वेगवान गोलंदाज भुवनेश्वरमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट येणे बाकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

