Share

वेगवान गोलंदाज भुवनेश्वरमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट येणे बाकी

Published On: 

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यादरम्यान देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक मान्यवरांना संकटाचा सामना करावा लागला. यातच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या वडीलांचे निधन झाले होते.

वडीलांच्या निधनानंतर काही दिवसातच भूवनेश्वरच्या आईची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला. यादरम्यान भूवनेश्वर आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरनाची लक्षणे जाणवत आहे. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आहे. मात्र अद्यापही त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आहवाल येईपर्यंत त्यांनी मेरठमधील राहत्या घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या महिन्यात २ जुन रोजी भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यातील भारतीय संघात भुवनेश्वरचा संघात समावेश करण्यात आला नाही. मात्र इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा भाग नसलेले खेळाडू हे जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भूवनेश्वरचा सहभाग नक्की मानला जात होता. तसेच या दौऱ्यात त्याला कर्णधारपद मिळेल अशी माहितीही समोर आली होती. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्यास या दौऱ्याच्या कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!