Share

“भावा खेळावर लक्ष दे” व्हिडीओ शेअर केल्यानंतर सैनी चाहत्याकडून ट्रोल

Published On: 

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा स्थगित झाल्यानंतर काहीच दिवसात बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू सध्या मुंबईत विलगीकरणात आहे. मात्र या दौऱ्यात संघात निवड न झालेले खेळाडू मात्र घरीच आहेत.

यादरम्यान भारतीय युवा गोलंदाज नवदीप सैनी हा घरीच आहे. काही दिवसापुर्वी त्याने महिंद्रा यांनी भेट दिलेली थार ही गाडी चालवताना दिसत आहे. यानंतर सैनीने ट्विटरवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सैनी हा हार्ले डेविडसन बाईकवर बसून शेतातील माती उडवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओत सैनीने शर्ट परिधान केलेला नाहीये, तसेच मास्कही परिधान केलेला नाही. हा व्हिडीओ बघुन अनेक चाहत्यांनी सैनीला हीरो बणन्याचा प्रयत्न नको करू असा सल्ला दिला आहे.

https://twitter.com/navdeepsaini96/status/1398893297830023170

तर काही चाहत्यांनी त्याला खेळावर लक्ष देण्याचा सल्ला देखील दिला आहे. एका चाहत्याने त्याला सचिन आणि कांबळी यांचे उदाहरण दिले आहे. तसेच काही चाहत्यांनी त्याला धुळ उडवल्यामुळे प्रदुषण पसरवत असल्याचा सल्ला दिला आहे. २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलेल्या सैनीला आगामी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/theprayagtiwari/status/1398907281580855300

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!