दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली होती. एकीकडे कोरोनाच्या रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मृत्यू होण्याचे प्रमाण ही वाढले. सर्व सामान्य व्यक्तिपासून ते दिग्गज कलाकारापर्यंत अनेकांना या कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे बऱ्याच जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. यातच अभिनेत्री संभावना सेठ हिनं देखील आपल्या वडिलांना गमावले. परंतु वडिलांच्या निधनासाठी संभावनानं रुग्णालयाला जबाबदार धरत तिने रुग्णालयाला थेट कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे संभावनाच्या वडिलांचं दिल्लीतील रुग्णालयात निधन झालं. यानंतर संभावना रुग्णालयावर प्रचंड संतापली आहे. त्या रुग्णालयात रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. केवळ पैसे उकळले जातात. शिवाय घरच्यांनी काहीही विचारल्यास त्यांना योग्य उत्तरं दिली जात नाहीत. त्यामुळं संभावनानं कायदेशीर रुग्णालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
https://www.instagram.com/p/CPPqO3tnbHk/?utm_source=ig_web_copy_link
एक मुलाखतीत संभावना म्हणाली की, ‘कोरोनाची लागण झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्यांनी त्यांच्या काही रक्त चाचण्या घेतल्या आणि काही दिवसातच ते बरे होतील असेही सांगितले. म्हणून आम्ही देखील शांत झालो. काही दिवसांनंतर माझा भाऊ वडिलांना भेटायला गेला, तेव्हा त्यांचे हात बांधलेले पाहून आम्हाला धक्का बसला. त्याने लगेच पप्पांचे हात उघडले आणि रुग्णालयाकडे त्याबद्दल चौकशी केली. तर, त्यांनी सलाईन काढू नये म्हणून तसे केले आहे, असे सांगण्यात आले.’
पुढे ती म्हणाली की, ‘याबाबत मी एक व्हिडीओ देखील तयार केला होता. परंतु रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तो व्हिडीओ हटवण्यास मला भाग पाडलं. मला असं वाटतंय की वडिलांचं निधन आधीच झालं होतं. परंतु केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांनी उपचाराचं नाटक केलं.’ संभावनाच्या या आरोपांवर रुग्णालयातील प्रशासनानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रुग्णालयातील या हलगर्जीपणाचा मुद्दा यापूर्वी देखील कित्येक लोकांनी समोर आणला होता त्यानंतर आता संभावणाने सुद्धा हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. याविरुद्ध ती ठाम उभी राहिली असून तिला न्याय मिळणार का? यावर अद्यापही प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण,म्हणाले…
- पेट्रोल नॉट-आऊट @शंभरी पार; पुणेरी शैलीत काँग्रेसची मोदी सरकारला चपराक !
- २४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर; ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
- ‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
- पुण्यापाठोपाठ आता आणखी एका शहरात सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

