मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडिओ योगगुरु रामदेवबाबा यांनी अॅलोपॅथी आणि आयुर्वेद वाद सुरु असताना शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमारनं अॅलोपॅथीवर भाष्य केले नाही मात्र आयुर्वेदाची स्तुती केली आहे, आणि हाच व्हिडिओ योगगुरु रामदेव यांनी शेअर करत अॅलोपॅथीवर निशाणा साधला आहे.
रामदेवबाबा यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘आपण आपल्या शरीराचे ब्रँड अँबेसेडर व्हा. साधं आणि निरोगी आयुष्य जगा. आमच्या भारतातील योग आणि आयुर्वेदात किती शक्ती आहे हे जगाला दाखवून देऊ. ही शक्ती इंग्रजांच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही’, असं कॅप्शन योगगुरु रामदेव यांनी दिलं आहे. त्यानंतर रामदेव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमार आयुर्वेदावर बोलताना दिसत आहे.
आप अपनी बॉडी के खुद ब्रांड अम्बेसडर बने,
सिंपल और हेल्दी लाइफ जीयें, और दुनिया को दिखा देते हैं, कि हमारे हिंदुस्तानी योग व आयुर्वेद में जो ताकत है,
वह किसी अंग्रेज के केमिकल इंजेक्शन में नहीं है- अक्षय कुमार।
साभार-अक्षय कुमार pic.twitter.com/hB7sNLmQJp— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 31, 2021
यात अक्षय म्हणतो की, ‘माझ्या बाबतीत खूप कमी लोकांना माहिती आहे. मी मागच्या २५ वर्षांपासून आयुर्वेद फॉलो करत आहे. निसर्गाने आपल्याला खूप मोठा आयुर्वेदीक साठा दिला आहे. मात्र आम्हाला त्याची कदर नाही आणि आपण इंग्रजांची औषधं खातो आणि स्टेरॉयड इंजेक्शन घेतो. आपण त्यांची उपचार पद्धती फॉलो करतो आणि ते लोकं आयुर्वेदात उपचार शोधत आहेत’. योगगुरु रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे एलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर एलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं. मात्र वाद शमण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण,म्हणाले…
- पेट्रोल नॉट-आऊट @शंभरी पार; पुणेरी शैलीत काँग्रेसची मोदी सरकारला चपराक !
- २४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर; ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
- ‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
- पुण्यापाठोपाठ आता आणखी एका शहरात सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

