मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परंतु या कोरोनाचा फटका केवळ सामान्य लोकांना नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकरांना देखील याचा आर्थिक फटका बसला आहे. चित्रीकरण बंद असल्याने कित्येक कलाकरांना काम नाही त्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिच्यावर देखील बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती स्वतःला ‘बेरोजगार’ असल्याचं म्हणत आहे. नुकतंच तिला मुंबईतल्या जुहू इथे स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी तिला तिच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल प्रश्न केला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, ‘कोरोना काळ सुरू असल्याने सध्या मी बेरोजगार आहे. एकदा हा कठिण काळ संपला की सगळ्यांनाच कामं मिळून जातील, तसंच मलाही मिळेल.’
https://www.instagram.com/p/CPfkYagBmQ3/?utm_source=ig_web_copy_link
पुढे फातिमा सना शेख म्हणाली, ‘सगळ्या चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संपर्क करण्यात मला कोणताच संकोच वाटत नाही. मी उपलब्ध आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी सतत त्यांना आठवण करून देत असते. कधी कधी लोक कास्टिंगमध्ये आम्ही सुद्धा कलाकार आहोत हे विसरून जातात.’ असेही ती म्हणाली.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री फातिमा सना शेखला कोरोना झाला होता. त्यानंतर तिने स्वतःला घरी आयसोलेट करून घेतलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर तिने कोरोनावर मात केली. आमिर खानच्या दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर तिला ‘दंगल’ चित्रपटातून लोकप्रियता मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण,म्हणाले…
- पेट्रोल नॉट-आऊट @शंभरी पार; पुणेरी शैलीत काँग्रेसची मोदी सरकारला चपराक !
- २४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर; ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
- ‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
- पुण्यापाठोपाठ आता आणखी एका शहरात सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

