मुंबई : महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या प्रकरणाबाबत नुकतीच एक बातमी चर्चेत आली. पोलिसांनी एका पार्टीवर छापा टाकला आणि 22 जणांना ताब्यात घेतले. या २२ जणांमध्ये कलाकार आणि नृत्यदिग्दर्शकांचा देखील समावेश आहे. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्टीकमधून पोलिसांनी ड्रग्ज आणि काही पैसेही जप्त केले. ताब्यात घेतलेल्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. की, या 22 लोकांमध्ये मराठी चित्रपट अभिनेत्री हिना पांचालचाही समावेश आहे.
गेल्या काही काळापासून ड्रग्स प्रकरणात अनेक खुलासे झाल्यानंतर आता पोलिस सर्व कलाकारांवर बारीक नजर ठेवून आहेत. आता ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिस अधिक कडक आणि सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ड्रग्जसह पार्टी करताना अनेक वेळा अटक केली आहे.
‘बिग बॉस मराठी’मध्ये हीना पांचाळ शोच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ट एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. हीना पांचाळनं हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिनं ‘आयटम साँग’ केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘इतक्या लहान वयात बॉयफ्रेन्डच्या नादाला लागू नको’; मुन्नी होतेय ट्रोल
- बहुप्रतीक्षित चित्रपट पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज
- अंकिताने ‘बिग बॉस-१५’मध्ये सहभागी होणाऱ्या चर्चांवर दिली प्रतिकिया
- ‘हे’ आमचे प्राथमिक उद्दीष्ट असणार आहे ; दौऱ्यापूर्वी द्रविड यांनी स्पष्ट केली रणनीती
- ‘सगळ्यांना संधी देणं शक्य नाही’ ; प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर द्रविडची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

