मुंबई : बॉलीवूड सुपरहिट अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात ‘मुन्नी’ची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्यावेळी हर्षाली अवघ्या सात वर्षांची होती. इतक्या लहान वयात तिने तिची भूमिका उत्तम निभावली होती. या चित्रपटामुळे तिला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली.
सध्या हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ व फोटो ती शेअर करत असते. खरे तर हर्षालीचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. परंतु नुकतेच तिने सोशल मीडीयावर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जाते आहे.
https://www.instagram.com/reel/CQfZfSDFzSJ/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओत हर्षाली तिच्या काल्पनिक बॉयफ्रेन्डसोबत बोलताना दिसत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ आवडला. पण अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हर्षालीला म्हंटले की,
‘अभ्यासात लक्ष घाल, इतक्या लवकरच बॉयफ्रेन्डच्या नादाला लागू नको,’ असा सल्ला दिला. यानंतर हर्षालीने ट्रोलर्सला उत्तरही दिले. अरे, तुम्ही फार सीरिअसली घेतले. हा व्हिडीओ केवळ गंमत म्हणून केला, असे ती यावर म्हणाली आहे.

बजरंगी भाईजान या सिनेमासाठी तिला स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. बजरंगी भाईजान चित्रपटाआधी तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’चा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

