पुणे : पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत होणारे तीनही सामने पुण्यातील एमसीए (गहुंजे) स्टेडियमवर खेळवले जात आहेत. या सामन्यामध्ये कृणाल पांड्यासह प्रसिद्ध कृष्णा याने देखील एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. त्याने सलामीवीर जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स यासारख्या खेळाडूंसह टॉम कुरणला बाद करून चार बळी आपल्या नावावर केल्या. पहिल्याच सामन्यात एवढ्या दिग्गज खेळाडूंचा बळी घेत त्याने भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्याच क्रिकेट रसिकांकडून कौतुक केलं जात आहे.
सामना संपल्यानंतर मॅचविनिंग फरफॉर्मन्सबद्दल बोलताना भागिदारी तोडणारा आणि हिट द डेक साठी ओळख असणारा बोलर्स म्हणून मला नाव कमवायचं आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध कृष्णाने दिली.
“मला चांगली सुरुवात मिळाली नाही. माझ्याविरोधात इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. पण मला माझ्यावर विश्वास होता. आम्ही ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट्स घेत गेलो ज्याचा संघाला फायदा झाला. सुरुवाचीच्या तून ओव्हर्सनंतर मला समजलं की मी फलंदाजांना पुढे चेंडू टाकून खेळवू शकत नाही. मी बॅटपासून दूर चेंडू टाकू लागलो आणि मला रिझल्ट दिसले”
विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृष्णाने सात सामन्यांत 24.5 च्या सरासरीने 14 गडी बाद केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. मला आयपीएलची मदत मिळाली पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे पुनरागमन होणे जास्त महत्त्वाचे होते. मला संघाच्या गरजेनुसार भागीदारी मोडीत काढणारा ‘हिट डेक’ गोलंदाज म्हणून ओळखले जायला हवे, असं तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती, परमबीर सिंह यांचा याचिकेत मोठा दावा
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘फडणवीस… उगाच लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा विश्वास ठेवत नाही’


