Share

खनिज तेलाच्या दरात घसरण; तर पेट्रोल -डिझेलचे दर स्थिर

Published On: 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्‍ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे.

इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारलाही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यानंतर आता राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी कपात स्पष्ट करण्यात येईल.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!