मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे.
इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारलाही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यानंतर आता राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी कपात स्पष्ट करण्यात येईल.
पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता- अजित डोभाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

