Share

कर चुकवेगिरीसाठी दुचाकीवर बनावट क्रमांक

Published On: 

औरंगाबाद : कर चुकवेगिरीसाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणा-या तरुणांविरुध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन शांताराम सातदिवे (५५, ह. मु. नाशिक, मुळ रा. मुकुंदवाडी, संजयनगर, गल्ली क्र. ३) आणि संतोष दामू पठारे अशी फसवेगिरी केलेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार १२ मे रोजी उघडकीस आला. तर नाकाबंदीदरम्यान बनावट क्रमांक टाकून फिरणा-या दुचाकीस्वाराला दौलताबाद पोलिसांनी पकडले.

रतन सातदिवे हे दुचाकी (एमएच-२०-सीएल-४६१२) घेऊन जात होते. त्यावेळी वाहतूक शाखेचे शिपाई संतोष बिघोत यांनी सातदिवे यांना पकडले. त्यांच्याकडे कागदपत्रांची वारंवार मागणी व विचारणा केली. मात्र, त्यांनी कोणतीही कागदपत्रे सोमवारपर्यंत आणून दिली नाही. तसेच वाळुज भागातील धनश्री अ;ॅटो या शोरुमकडे दुचाकीच्या नोंदणीबाबत विचारणा केली. पण तेथेही नोंद नसल्याचे उघडकीस आले. तब्बल सात ते आठ वर्षांपासून कर चुकविण्यासाठी पासिंग न करता सातदिवे आणि पठारे हे दुचाकीचा वापर करत होते. त्यावरुन सोमवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नाकाबंदीदरम्यान दौलताबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी मोहंमद यासीन अब्दुल लतीफ (३१, रा. सुलीभंजन, ता. खुलताबाद) याला सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दौलताबाद घाटात पकडले. त्यावेळी दुचाकीच्या क्रमांकाची तपासणी केली असता तिच्यावरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. त्यावरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!