औरंंगाबाद : अटकेत असलेल्या आरोपीच्या जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश किसनराव दाभाडे (वय ४८, रा.भाग्योदयनगर, जालना) असे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्याचे नाव आहे.
एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या राजेंद्र रंगनाथ हरबक (रा.चापडगांव, ता.घनसावंगी, जालना) याच्या जामीनासाठी राजेश दाभाडे यांनी ३ जून रोजी जमिनीची कागदपत्रे सादर केली होती. जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक नितीन राजेश मराठे (वय ४९) यांनी कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले.
जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक नितीन मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेश दाभाडे यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल भदरगे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; म्हणाले, यंदाचा सोहळा…
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

