Share

मुनगंटीवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर फडणवीस, चंद्रकांतदादांनी गाठले थेट संघ मुख्यालय !

Published On: 

नागपूर : अधिवेशन एकहाती गाजवल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गाठले आहे. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आहेत. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय गाठले.

सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे दखील बैठकीला उपस्थित होते. दीड तास बंद दरवाज्याआड झालेल्या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या मुद्यांवरून ही बैठक झाली आणि कोणत्या कारणासाठी सदर बैठक झाली, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मुनगंटीवार हे भाजपमधील बडे नेते असून त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा सत्ता बदल होण्याच्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांनतर संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!