🕒 1 min read
इस्लामाबाद : पाकिस्तानी संघाचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यानं २००६ सालच्या अविश्वसनीय कामगिरीचं श्रेय इस्लामला दिलं. इस्लामचा स्वीकार केल्यामुळे खेळात प्रचंड सुधारणा झाली, असे युसूफ म्हणाला. याची सुरुवात भारताविरुद्धच्या १७३ धावांच्या खेळीनं झाली. त्यानंतर युसूफनं इंग्लंड दौरा गाजवला. त्यानं एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या सर व्ही व्ही एन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला.
२००६च्या कॅलेंडर वर्षात १७८८ धावा चोपल्या. विज्डनला दिलेल्या एका मुलाखतीत युसूफनं हे कबुल केलं की त्याच्या आयुष्यावर सइद अन्वरचा प्रभाव होता. मुलीच्या मृत्यूनंतर सइद धर्माच्या दिशेनं झुकत होता आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेले बदल युसूफनं पाहिले होते. त्यामुळेच त्यानेही इस्लामचा स्वीकार केला.
युसूफनं इस्लामचा स्वीकार करण्याबद्दल PakPassion.net ला सांगितले की,”इस्लामचा स्वीकार करण्यासाठी माझ्यावर कुणीच जबरदस्ती केली नाही. अनेकांनी तसे आरोप केले होते. पण, सइन अन्वरच्या आयुष्यात झालेल्या बदलांमुळे मला तसे करावेसे वाटले. तो माझा चांगला मित्र होता आणि त्याचे आई-वडील मला मुलगाच मानायचे. त्याच्या घरी गेल्यावर शांती असायची. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली. मीही इस्लामचा स्वीकार केला अन् आयुष्यात अनेक चांगले बदल झाले.” इस्लाम स्वीकारल्यानंतर मन शांत वाटू लागले अन् मानसिक स्थैर्य प्राप्त झाले, त्यामुळेच अनेक विक्रम मोडू शकलो. व्ही व्ही एन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडू शकेल हा विचारही मी कधी केला नव्हता.”
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?

