🕒 1 min read
कर्नाटक : सध्याच्या काळात सगळ्याच वस्तू नागरिकांना घर बसल्या अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. लोक देखील या ऑनलाइन सर्विसला पसंती देत आहेत. गडबडीच्या जीवनात ऑनलाइन सेवेचा वापर देखील अधिक वाढला आहे. अशामध्येच आता घरपोच जेवण देणारा झोमॅटो अॅप चांगलाच तेजीत आहे.
परंतु अनेकवेळा ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे चूकीचे अनुभव देखील आले आहेत. अशाच एका महिलेने घरी ऑनलाइन फूड डिलिवरी अॅप झोमॅटोवरून जेवण मागवलं परतू हे ऑनलाइन फूड मागवण तिला घातक ठरल आहे. पीडित महिलेने व्हिडीओ बनवून नेमका काय प्रकार घडला याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
या व्हिडीओ मधील महिलेने सांगितले की, झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ऑर्डरला उशीर होत असल्यानं महिलेनं कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन केला आणि डिलिवरी वेळेवर न मिळाल्यानं ऑर्डर रद्द केली. कस्टमर केअर बोलत असतानाच डिलिवरी बॉय घरी जेवण घेऊन आला. त्यांतर मात्र या महिलेने जेवण घेण्यास नकार दिला. याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरु झाला.
https://twitter.com/HChandranee/status/1369486163140956160?s=20
नकार दिल्यानंतर देखील डिलिवरी बॉय जेवणाचा बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पीडीत महिलेने घरात शिरण्यास नकार केला. यातच डिलिवरी बॉय चिडून तुझा नोकर आहे का असे म्हणत तिच्या नाकावर एक पंच मारला आणि तेथून फरार झाला.
या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरली आणि तिने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले. यावेळी तिच्या मदतीला कोणीही आलं नसल्याचे ती सांगते. यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दिली यावेळी तिला पोलिसांनी मदतीचं आणि आरोपीला पकडण्याचं आश्वासन दिले. या महिलेने केलेल्या आरोपांची झोमॅटोने दखल घेतली असून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेबद्दल कंपनीने या महिलेची माफी मागितली आहे. कंपनी आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करून पोलिसांना संपूर्ण सहाय्य करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अशी घटना होऊ नये म्हणून त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. या घटनेमुळे अनेक जणांनी सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
