मुंबई : बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.
यातच बुधवारी अधिवेशनाची सुरुवातीलाच विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर जोर धरून ठेवला. अधिवेशनाची शेवट वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याने आणि एपीआय सचिन वाझे यांच्या बदलीने झाला. त्यामुळे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार फटका दिला आहे. याचे संपूर्ण यश हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे असून त्यांना कायद्याची जाण, प्रशासकीय पकड, आणि आक्रमकता या जोरावर हे शक्य झाले आहे. मात्र राज्यात कोरोनाचे बळी वाढत आहेत, कोरोना संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने कहर केला आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून फडनविसांना देण्यात आला आहे.
याच अग्रलेखावर आता देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. जनहिताचे मुद्द्यावरून उचलेली आमची जबाबदारी आणि नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलले. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला. त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं,” असा टोला विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
विजेच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय खोटी निवदेन करुन पुन्हा एकदा वीज कापणी सुरु केली आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहोत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- शुभकार्य कधी ना कधी होणारच… ठाकरे सरकार तीन महिन्यात पडणार?
- ‘दोन्ही बाजूंनी मने जुळावी लागतात, म्हणून सोनिया गांधींशी संपर्क नाही’
- राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शिफारस
- राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शिफारस
- ‘देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करुन द्या, नंतर बाहेर पाठवून पैसे कमावण्याचा विचार करा’


