Share

शुभकार्य कधी ना कधी होणारच… ठाकरे सरकार तीन महिन्यात पडणार?

Published On: 

मुंबई- “राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मुनगंटीवार हे भाजपमधील बडे नेते असून त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा सत्ता बदल होण्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

“जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात 116 तास 39 मिनिटे अधिवेशन झालं. यावेळी 47 तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.

तत्पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात एक शेर सादर केल्यानंतरच हि चर्चा सुरु झाली होती.’कुछ देर की खामोशी हैं, फिर से शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा हैं, हमारा दौर फिर से आयेगा या मुनगंटीवारांच्या वाक्यामुळे चर्चेला एक दिशा मिळाली आहे.

सत्ताधाऱ्यांना उद्देशून सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्याचा काळ उरला आहे, असे का म्हटले असावे, अशी चर्चा जो-तो करू लागला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे का?… तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान,आज सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात सत्तापालट होणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय पटलावर उपस्थित होत आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असताना फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला आणि त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!