🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. शिवसेना आणि शिंदे गटातील वादामुळे महाविकास आघाडी सरकार मात्र चांगलच अडचणीत आलं आहे. एकीकडे या सर्व घटना सुरु असताना आता यामध्ये भाजपाने एंट्री केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातून बाहेर येताच त्यांनी माध्यमंही संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, “आज माननीय राज्यपालांना ईमेल आणि थेट पत्र देऊन भाजपने मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले. राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेचे 39 आमदार पक्षाबाहेर असून ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत नसल्याचे सातत्याने सांगत आहेत. म्हणूनच आम्ही माननीय राज्यपालांना तत्काळ मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यास सांगितले.”
दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी न बोलता विमानतळावरून थेट मुंबईला रवाना झाले. मुंबईत येताच भाजप नेते त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यातील घरी पोहोचले. थोड्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
