पुणे : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज भाजपचे आज राज्यभर ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे.
या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचत विरोधकांना देखील झापलं आहे.
दरम्यान, फडणवीस पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक गावातील कार्यक्रमास थेट बैलगाडीवर स्वार होऊन दाखल झाले. त्यांच्या या बैलगाडी स्वारीची चर्चा चांगलीच रंगली आहे.त्यांच्यासोबत भाजप नेते हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
‘मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’ अशी टीका त्यांनी या कार्यक्रमावेळी केली.
‘मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत’ असा घणाघात देखील फडणवीसांनी केला आहे.
या कार्यक्रमाला माझ्यासोबत हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर आदी अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. pic.twitter.com/pgq0HWNqYq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 25, 2020
महत्वाच्या बातम्या
- मनसेचं खळखट्याक : पुण्यापाठोपाठ मुंबईत ऍमेझॉनचं कार्यालय कार्यकर्त्यांनी फोडलं!
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- ‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’
- आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या : राष्ट्रवादी
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

