Share

आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या : राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू झाली असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे.

भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलंय.

पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.

दरम्यान, आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या… स्वतः विश्वासघातकी भूमिका घेता आणि कुठल्या तोंडाने आमच्यावर टिका करत आहात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे. मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे. यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टिका करत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!