मुंबई : ऍमेझॉन या शॉपिंग कंपनीच्या सेवांमध्ये मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऍमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो ऍमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. या वादावरून ऍमेझॉन ने न्यायालयात धाव देखील घेतली आहे. दिंडोशी न्यायालयाने याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना नोटीस बजावली आहे.
यानंतर, मनसेने ऍमेझॉनला दणका दिला आहे. ‘ऍमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे,’ असा इशारा काल मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.
यानंतर, मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन सकाळी पुण्यातील कोंढव्यातील ऍमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं. यानंतर, मनसेचा खळखट्याक पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील दिसून आला. आता, मनसेने मुंबईतील चांदिवली येथील साकीविहार मार्गावर ऍमेझॉन वेअर हाऊस फोडलं आहे. ‘महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल’, असे मनसेने गुरुवारीच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. त्यामुळे आता मनसे विरुद्ध ऍमेझॉन हा संघर्ष वाढताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू – महाजन
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- ‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’
- आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या : राष्ट्रवादी
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

