जालना: मागील काही दिवसांमध्ये लावण्यात आलेले कडक निर्बंधांनंतर सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्याने, राज्य शासनाने आणखीन कडक निर्बंध लावली आहेत. त्यामुळे पाचशेपेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या उद्योगाच्या बाबतीत सर्व सुविधायुक्त क्वारंटाईन केंद्रे स्थापन करावीत. उद्योगाच्या परिसराबाहेर अशी सुविधा उभारल्यास बाधित व्यक्तींना वरील सुविधेच्या ठिकाणी हलवताना इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरुन संक्रमण वाढणार नाही, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ साथरोग अधिनियम १९८७ फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ अन्वये प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्ह्यात खालील प्रमाणे स्पष्टीकरणासह दि. ३० एप्रिलपर्यंत लागु करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुक ज्यास काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे, त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व पध्दतींच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक सेवा देखील समाविष्ट आहेत.
यामध्ये विमानतळावर आवश्यक असलेल्या मालमत्ता, तिकिट सेवा इत्यादी आवश्यक असणा-या सर्व प्रसंगांचा समावेश आहे. परवानगी असलेल्या उत्पादनाच्या उपक्रमांमध्ये उत्पादन प्रक्रियेत सामील झालेल्या आणि संबंधित उत्पादन चक्र पुर्ण करण्यासाठी, पुर्व प्रेषण प्रमाणपत्रे, वैधानिक दाखल करण्याची आवश्यकता इत्यादी सर्व घटनांचा समावेश आहे. एक अत्यावश्यक सेवा म्हणुन सुचीबध्द केलेल्या कृषी संबंधित आवश्यक असणा-या सर्व सेवांचा समावेश आहे ज्यात शेतीशी संबंधीत सर्व बाबी, बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती इत्यादींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालना; सकाळी उघडलेली बाजारपेठ पोलीस येताच बंद!
- ‘या’ कारणामुळे झाला कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

