नवी दिल्ली : पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरिबांना मोफत धान्य दिलं गेलं होतं. आता दुसऱ्या लाटेमुळे या योजनेला दिवाळीपर्यंत वाढवण्यात आलं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिलं जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने रेशनधारकांना मोठा फायदा होणारे.
त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले. १ मे पासून राज्यांना २५ टक्के काम सोपवण्यात आलं, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.
आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती २५ टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केलं जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार अशी घोषणा मोदींनी केली.
तसेच मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल असे मोदींनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार, मोदींची घोषणा
- ‘अस्वस्थता नाही, पण आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे’, खडसेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर
- ‘नावे ठेवणारे आता आमचेच अनुकरण करत आहेत’, विनायक मेटेंचा छत्रपती संभाजीराजेंना टोला
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार
- ‘मुंबईतील नोकरदार वर्ग ऑफिसला कसा जाणार?’, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्री ठाकरेंना घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
