नवी दिल्ली : २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली.
मोदी म्हणाले, देशातील नागरिक नियम पाळत आहेत. लसीकरण नीट सुरु झालं. अशावेळी काही राज्यांनी लसीकरणाबाबत प्रश्न विचारले, वयोगट का, विकेंद्रीकरण का नाही, ज्येष्ठांनाच का पहिले लस, देशातील काही मीडियाने याबाबत कॅम्पेन केलं, मात्र अनेक चर्चेनंतर राज्यांच्या आग्रहास्ताव १६ जानेवारीपासून नियम बदल करण्यात आला. २५ टक्के काम राज्यांवर सोपवण्यात आलं.
१ मे पासून राज्यांना २५ टक्के काम सोपवण्यात आलं, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.
आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती २५ टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केलं जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार अशी घोषणा मोदींनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘अस्वस्थता नाही, पण आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे’, खडसेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर
- ‘नावे ठेवणारे आता आमचेच अनुकरण करत आहेत’, विनायक मेटेंचा छत्रपती संभाजीराजेंना टोला
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार
- ‘मुंबईतील नोकरदार वर्ग ऑफिसला कसा जाणार?’, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्री ठाकरेंना घरचा आहेर
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
