Share

कामगार दिनी मनपा कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम! अजून किती दिवस अन्याय सहन करायचा?

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. बाहेर कोरोना आणि त्यातच नियमित पगार होत नसल्यामुळे दैनंदिन खर्च भागवतांना मोठी ओढाताण सहन करावी लागत आहे. कामगार कायदे हे फक्त कागदावरच आहेत. महानगरपालिकेत कोरोनाच्या दिड वर्षाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गावर आज उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी तसेच कायम कर्मचाऱ्यांचे वेतन ररखडल्यामुळे शनिवारी(दि.१) कामगार दिनी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

कामगार कायदे कमकुवत झाले आहेत, कर्मचाऱ्यांना आता कुणी वाली राहिलेला नाही. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून मनपाचे कर्मचारी ऑन फिल्ड आहेत. आत्तापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. कठिण काळात फ्रंटलाईनवर काम करूनही आज यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ४ महिन्यांपासून रखडले आहे, तर कायम कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून झालेला नाही. याबाबत पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटी अनुदानावर अवलंबून आहेत. शासनाकडून जीएसटीचे पैसे मिळाले नाहीत तर, इतर महापालिकांमध्ये असलेल्या फंडातून पगार केला जातो, परंतु औरंगाबाद महापालिकेत ही पद्धत अवलंबली जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे अनुदान मि‌ळण्यात अनियमितता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. हस्तांतरित झालेले कर्मचारी, दैनिक वेतनावरील कर्मचारी, कंत्राटदार एजन्सीजच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी असे जवळपास दीड हजार कर्मचारी मनपात कार्यरत आहेत.

फ्रंटलाईनवर काम करुनही आज उपासमारीची वेळ

कामगार कायद्यांना सध्या महत्त्व नाही. त्यामुळे कामगारांची अवस्था वाईट झाली आहे. कोरोनाच्या एवढ्या कठिण काळात फ्रंटलाईनवर काम करुनही आज मनपा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जकात कर गेला जीएसटी कर आला. मात्र यास विलंब होत असल्याने कर्मचारी वर्गाला व्याजावर पैसे घेण्याची वेळ आली आहे. याचाच निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावून केले.
– गौतम खरात, कामगार शक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!