Share

“अनुभवी रवींद्र जडेजा संघात नसणे, इंग्लंडसाठी दिलासादायक”, माजी क्रिकेटपटुचे वक्तव्य

Published On: 

मुंबई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

महिन्यात सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बूचरनेही आगामी मालिकेविषयी आपली मते मांडली. भारतीय फिरकीपटू सर्वात्तम आहेत तरीही, अष्टपैलू रवींद्र जडेजा नसणे, इंग्लंडच्या फायद्याचे आहे, असे बूचरने म्हटले.

भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना बूचर पुढे म्हणाला, ‘भारतीय संघाकडे दर्जेदार फिरकीपटूंची कमतरता नाही. आमच्या नवख्या फलंदाजांना त्यांचा सामना करणे अवघड जाईल. परंतु, अनुभवी रवींद्र जडेजा संघात नसणे, इंग्लंडसाठी दिलासादायक आहे. भारताची जागतिक दर्जाची गोलंदाजी जडेजामुळे आणखीन धारदार बनते.’

भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!