Share

बाबा हारले तरीही मुलगी आनंदी! डेविड वॉर्नर ची मुलगी विराटची जबरा फॅन

Published On: 

ऑस्ट्रेलिया : काही दिवसांपुर्वीच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर यजमान ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू निराश दिसून आले. मात्र सलामीवीर डेविड वॉर्नर याच्या कुटुंबातील एका फार आनंदी झाली आहे. याची माहिती स्वत: वॉर्नरने दिली आहे.

वॉर्नरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याची मुलगी इंडी रे ही विराट कोहलीची सही असलेली जर्सी घालून उभी असलेला हा फोटो आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्याने विराटची जर्सी घालून तिला किती आनंद झाला असावा, हे स्पष्ट दिसते.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये वॉर्नरने लिहिले आहे की, ‘मला माहिती आहे आमचा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाला आहे. पण इथे एक मुलगी खूप खूष आहे. विराट तू दिलेल्या जर्सीसाठी तुझे खूप खूप आभार. इंडीला खरोखरच तुझीही ही भेट खूप आवडली आहे. बाबा आणि ऍरॉन फिंच असतानाही तिला विराटला खूप आवडतो.’

https://www.instagram.com/p/CKqVka5Lm20/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!