Share

भज्जी चेन्नई संघातून मुक्त; पण ‘हे’ ३ संघ बोली लावण्यास उत्सुक

Published On: 

मुंबई : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या

आयपीएलमधील खेळाडूंची देवाण-घेवाण आता मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने तब्बल तीन कोटी रुपये मोजत राजस्थानच्या एका अनुभवी खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

या लिलावापुर्वी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याचा चेन्नई सुपर किंग्स संघासोबतचा प्रवास संपला आहे. स्वत: हरभजनने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे चेन्नई संघातून मुक्त झालेल्या हरभजनवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

2 वर्षे चेन्नईकडून खेळल्यानंतर हरभजन पुन्हा एकदा लिलावात सामील होणार आहे. हरभजनने बऱ्याच कालावधीपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे आयपीएल लिलावामध्ये हरभजनवर कोणताही संघ बोली लावणार नसल्याचा अंदाज अनेक क्रिकेट तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र असे 3 संघ आहे जे हरभजनसाठी बोली लावण्यास उत्सुक असतील.

1) किंग्स इलेव्हन पंजाब –

किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सध्या फिरकीपटूंची कमतरता आहे. त्यांच्याकडे सध्या रवी बिष्णोई हा एकमात्र फिरकी गोलंदाज आहे. पंजाबने कृष्णप्पा गौतम व मुजीब उर रहमानला संघातून मुक्त केले असल्यामुळे हरभजनला संधी मिळू शकते.

२) सनराइजझर्स हैदराबाद –

हरभजनकडे टी20 क्रिकेटचा मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद देखील हरभजनवर डाव लावण्यास उत्सुक असेल. संघाकडे राशिद खान हा एकमेव प्रमुख फिरकी गोलंदाज असल्यामुळे हैदराबाद संघ फिरकीपटूच्या शोधात आहे.

3) राजस्थान रॉयल्स –

राजस्थानकडे राहुल तेवतिया व श्रेयस गोपाल हे 2 फिरकीपटू आहेत. मात्र ते मागच्या वर्षी महागडे ठरले होते. तेवतियाकडे तितक्या प्रमाणात अनुभव नाही. त्यामुळे राजस्थान संघदेखील हरभजनवर डाव लावू शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!