Share

तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश ! ममतांपुढे सत्ता राखण्याच आव्हान…

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

बंगालमध्ये ममता यांच्या तृणमूलला गळती लागली असून, अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षात विशेषतः भाजप मध्ये प्रवेश करत आहे. अशातच ममता यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण शनिवारी तृणमूलच्या पाच नेत्यांनी भाजपात प्रवेश केल आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला आणखी बळकटी मिळाली असून तृणमूल काँग्रेस पुढे आव्हान निर्माण झाले आहे.

यामध्ये राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष या पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली. शाह म्हणाले,”तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील,” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच वनमंत्री असलेल्या रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला होता. रजीब बॅनर्जी यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलं नव्हत. राजीनामा देताना रजीब बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली होती. रजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते आपल्याविरोधात प्रचार करत असल्याची तक्रार देखील केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!