बीड: सोशल मिडीयाच्या काळात पारंपारीक वाचन करणारे सुद्धा काळासोबत बदलत जात आहेत. लिखाण करणारेही सोशल मिडीयावर जास्त लिहतात. पण कोरोना संसर्ग काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग अनेक जणांनी वाचनाचा छंद जोपासण्यात केला. याच काळात बीड येथील उत्कर्षा गंध हिनेही वाचनाचा छंद जोपासला. आपल्या आवडत्या लेखकांची पुस्तके, आत्माचरीत्रे तिने वाचून काढली. यातुनच तिला लिखाणाची प्रेरणा मिळाली. आणि अवघ्या सहा दिवसांत तिने आपल्या वडिलांच्या आयुष्यावर ‘सिगिंग द अनसंग: ए जर्नी ऑफ लाइफटाइम इल्युमिनेशन’ हे पुस्तक लिहीले.
लॉकडाउन मध्ये बीड येथील चंपावती इंग्लिश स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी उत्कर्षा अरविंद गंधे हिने हे पुस्तक लिहले आहे. लॉकडाउनच्या काळात ती आठ-नऊ महिन्यापासून घरुनच आभ्यास करत होती. अवातंर वेळेत तिने आपला वाचनाचा छंद जोपासला. यातुनच तिला आपणही पुस्तक लिहावे असे वाटले. शाळेत निबंध, कविता लिहीण्याचा तिला सराव होता. पुस्तकासाठी उत्कर्षाने व्यवसायाने शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांचा प्रवास लिहण्याचे ठरवीले. यात आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटते, तसेच त्यांच्या इतर विद्यार्थ्यांचे त्यांच्याबद्दल असणारे मत काय. याबद्दल लिहावे असे तिला वाटले. या कामात मैत्रीण अदिती सानप हिने तिची मदत केली. डिसेंबर महिन्यात लिखाणाला तिने सुरुवात केली आणि अवघ्या सहा दिवसात तिने १७२ पानांचे पुस्तक लिहून पुर्ण केले. या पुस्तकात तिने आपले वडिल शिक्षक म्हणून कशा पध्दतीने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करतात, हे स्वत: च्या अनुभावातून पुस्तकात शब्दबध्द केले.
हे पुस्तक प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी अमेझॉनवर हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पाच दिवसांत १३ जणांनी हे पुस्तक खरेदी केले आहे. लिखाणामुळे काहीतरी वेगळे करण्याचा अनोखा आनंद मिळाला असल्याचे उत्कर्षा व अदिती यांनी म्हणले आहे. पालक व शिक्षक हे मुलांना घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. माझे बाबा हे शिक्षक व पालक या दोन्ही रूपांनी मला आदर्श वाटतात. त्यामुळे त्यांच्याप्रति भावना व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक लिहिले असे उत्कर्षा गंधे हिने सांगितले. केदारनाथ खिस्ते, डॉ.अनुराधा देवकत्ते, डॉ.प्रसन्न लोध, प्रथमेश देशपांडे, देवकर यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी उत्कर्षाला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
महत्वाच्या बातम्या
- आर्थिक सर्वेक्षण न छापणे हीच सरकारची उत्तम कामगिरी ; चिदंबरम यांचा मोदी सरकारला टोला
- किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप, सोमय्या कुटुंब अडचणीत
- …तर ५ मिनिटांत शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल : संजय राऊत
- ११ हजार विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन पेट परीक्षा
- ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, केंद्रात मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न विचारताच राणेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

