नांदेड: केंद्र सरकारने विशेष किसान रेल्वे सुरू केली आहे. कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढावे हे या विशेष रेल्वेचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत नांदेड रेल्वे विभागातून नगरसोल स्थानकावरून २५ गाड्यांतून उत्तर भारत व पूर्वोत्तर राज्यात कांदा व इतर शेतमाल पाठवण्यात आला होता. या रेल्वेतून न्यू गुवाहाटी, न्यू जलपायगुडी, चितपूर, मालडा, आगरतळा आदी ठिकाणी कांदा आणि शेतमाल पाठवण्यात आला. या विशेष २५ किसान रेल्वेंतून नांदेड विभागास ५.२५ कोटींचा महसूल मिळाला आहे.
पहिली किसान एक्सप्रेस ५ जानेवारी रोजी नांदेड विभागा नगरसोल येथून सोडण्यात आली होती. या गाड्या वेळापत्रकानुसार साधरण ५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. यामुळे शेतीमाल वेळेवर पोहचतो. तसेच यामुळे शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स : टॉप टू टोटल’ अंतर्गत किसान रेल्वेद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.
याव्यतिरीक्त वसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वेस्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रॅक पाठवले. तसेच आदिलाबाद येथून पाच मक्याचे रॅक, हिंगाेली रेल्वे स्थानकावरून सरकीचे ३ रॅक, तसेच मालटेकडी-नांदेड येथून गुळाचे ५ रॅक पाठवण्यात आले आहेत. यावर्षी किसान रेल्वेव्यतिरिक्त नांदेड विभागाने या वर्षी मालवाहतुकीत अव्वल क्रमांक पटकावला. या वर्षी मार्च महिन्याआखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे उद्दीष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
- तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश ! ममतांपुढे सत्ता राखण्याच आव्हान…
- बाबा हारले तरीही मुलगी आनंदी! डेविड वॉर्नर ची मुलगी विराटची जबरा फॅन
- भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर ; जस्टिन लँगरचं प्रशिक्षकपद धोक्यात
- ‘पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो.’
- जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

