Share

माचीसची काडी महागली! दिवाळी आली, महागाईचे काय करणार?; राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

Published On: 

मुंबई : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच कोरोना काळामुळे अनेकांना चांगलाच फटका बसला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. अनेकांची उपजिवीका भागवण्याचं साधन संपलं तर कोणाच्या कुटुंबातील कर्ताधर्ता व्यक्तीच कोरोनामुळे गेला. या सगळ्यातून सर्वसामान्य सावरतो तोच महागाईचा भडका उडाला. पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ झाली. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर मगाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी रोखठोकमधून केंद्रावर निशाणा साधला आहे.

महागाई का वाढली यावर मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवीत आहेत. कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल, डिझेल महागले, असे केंद्रीय मंत्री रामचंद्र तेली सांगतात. पेट्रोलने शंभरी पार केली त्यावर सगळेच गप्प. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सगळेच अडकले आहेत! दिवाळी येत आहे. दिवाळी असली काय नसली काय, आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके तर 365 दिवस फुटत असतात. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे या वेळची दिवाळी मोकळय़ा वातावरणात साजरी होईल, पण सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय? महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱ्यांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱया जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सत्ताधारी भाजपची यावर मखलाशी कशी ती पहा. त्यांचा युक्तिवाद असा की, ‘‘महाराष्ट्रात किंवा देशात पेट्रोलने शंभरी पार केली म्हणून का रडता? पाकिस्तानातही पेट्रोल 137 रुपयांवर पोहोचलेय!’’ पण ही वकिली करणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, हे ‘137’ पाकिस्तानी रुपयांत आहेत. जे हिंदुस्थानी रुपयांत 59 रुपये होतात. हिंदुस्थानात पेट्रोलचे भाव दिल्लीत 106 रुपये आणि मुंबईत 115 रुपयांपर्यंत पोहोचले. यावर कुणी बोलत नाही व सगळेच राजकीय पक्ष मुंबईच्या समुद्रातील क्रुझ पार्टीत अडकून पडले!, असं संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!