औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद, महाराष्ट्रामध्ये, आमचा पक्ष येथे सर्व निवडणुका लढवेल आणि गरज पडल्यास इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याचा पर्याय खुला ठेवेल, असे एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेसह राज्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एमआयएम लढणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेकांशी युतीचे पर्याय खुले असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची खुलताबाद येथे ३० ऑक्टोबर रोजी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो. त्यांची कोणीतरी दिशाभूल केली. विधानसभेला त्यांनी युती तोडली. आम्ही नाही. पण यापुढील निवडणुकीत युतीचा पर्याय आहे. ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली असे वक्तव्य करतात त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची युती आहे. त्यावरून या दोन पक्षांची विचारधारा कळते. त्यांना फक्त मुस्लिमांची मते हवी असतात. त्यांना मुस्लिमांची काळजी असेल तर त्यांनी ५ टक्के आरक्षण द्यावे. तसेच आता केंद्र सरकारने संविधानात संशोधन करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी असे ते म्हणाले.
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार असल्याचं ओवेसी यांनी जाहीर केलं. मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण तिरंगा रॅलीत सहभागी होतील. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ही रॅली काढली जाणार आहे. महमूद उर रहेमान कमिटीने सांगितले आहे की, मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे. उच्च न्यायालयानेही मुस्लिमांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण मान्य केले आहे. दलितांनंतर मुस्लिम मागास आहेत, असे जलील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ


