नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-20 देशांच्या शिखर बैठकीसाठी इटलीत पोहचले आहेत. तसेच काल(३० ऑक्टो.) तिथे पोहोचल्यावर मोदींनी कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. तसेच त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले. या भेटीनंतर भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे.
At the Vatican City, PM @narendramodi had a meeting with Pope Francis. @Pontifex pic.twitter.com/o9OobfIBkL
— PMO India (@PMOIndia) October 30, 2021
या ऐतिहासिक भेटीवर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मत व्यक्त केले असून ते म्हणाले की,’या भेटीमधून भारताचा सन्मान अधिक वाढला आहे, असं मत संघाने व्यक्त केलं आहे. अखिल भारतीय कार्यकारणी मंडळाची तीन दिवसीय बैठकीचा कालचा शेवटचा दिवस होता. ही बैठक संपल्यानंतर सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या भेटीसंदर्भात भाष्य केलं. “जर देशातील सरकारच्या प्रमुखांनी जगात सध्या असणाऱ्या नागरी जीवनामधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या व्यक्तीची भेट घेतली तर त्यात गैर काय आहे? आपण सर्वजण हे वसुधैव कुटुम्बकम या विचारसणीवर विश्वास ठेवणारे आहोत, आपण सर्व धर्मांचा सन्मान करतो.’
दरम्यान,’ही सन्मानाची गोष्ट आहे की पंतप्रधान हे इतर देशांच्या प्रमुखांना भेटत आहेत. या भेटीमुळे आपल्या देशाचा सन्मान वाढत आहे. तसेच मोदी आणि पोप यांची भेट ही दोन देशांमधील सरकारचे प्रमुख नेते भेटण्यासाठी होती. त्यामुळे पंतप्रधानांनी कोणाला भेटावं हे ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे, असेही होसबळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांना तुरूंगात ठेवून पब्लिसिटी करून घेणं हा वानखेडेचा उद्योग’- नवाब मलिक
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…


