औरंगाबाद : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एमआयएम लढणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेकांशी युतीचे पर्याय खुले असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो. त्यांची कोणीतरी दिशाभूल केली. विधानसभेला त्यांनी युती तोडली. आम्ही नाही. पण यापुढील निवडणुकीत युतीचा पर्याय आहे. ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली असे वक्तव्य करतात त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची युती आहे. त्यावरून या दोन पक्षांची विचारधारा कळते. त्यांना फक्त मुस्लिमांची मते हवी असतात. त्यांना मुस्लिमांची काळजी असेल तर त्यांनी ५ टक्के आरक्षण द्यावे. तसेच आता केंद्र सरकारने संविधानात संशोधन करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओवेसींनी केली.
राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. कधी काहीही घडू शकते. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करू, असे म्हणत ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबाबत निवडणूक लढण्याचे एकप्रकारे संकेत दिले. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लग्न करतात हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा खोचक सवालही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
- पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल
- ‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे- धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

